छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : हैदराबाद मुक्तिसंग्राम
दिनानिमित्त 'टीम शहरनामा'ने रविवारी (दि.१३) सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्रहालयात हेरिटेज वॉक घेतला. इतिहास व पुरातत्त्व विभाग, एमजीएम विद्यापीठ, आख्यान फाउंडेशन, गरवारे कम्युनिटी सेंटर, अॅडगाइड मीडिया प्रा. लि. आणि केंद्रीय पर्यटन विभाग व टीम शहरनामाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. अनंत राक्षसभुवनकर यांनी मुक्तीसंग्रामातील हृद्य आठवण सांगितली. यावेळी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, रमाकांत रौतल्ले, भारत पर्यटन विभागाच्या सहायक निदेशक स्नेहल पाटील उपस्थित होत्या. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास वर्तमानातही महत्त्वाचा आहे, याकडे डॉ. भागवत वाघ यांनी लक्ष वेधले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions














